नागपूर : एका महिलेला धमकावून तिला ब्लॅकमेल करून 36 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इल्युजन कॅफेचा मालक गौरांग शिक्षार्थी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.पीडित तरुणी, जी विवाहित आहे, तिचे नागपुरात रेस्टॉरंट देखील आहे. जानेवारी 2022 मध्ये ती आरोपी शिक्षाार्थीच्या संपर्कात आली. समान व्यवसायामुळे दोघांची मैत्री वाढली.
मात्र, पीडितेचा पती बिझनेस ट्रिपवर गेला असताना, आरोपीने जुलै 2023 मध्ये महिलेसोबत गैरवर्तणूक केली.नंतर त्याने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, 36 लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केला, अश्लील चॅट दाखवून तिचे लग्न उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. पीडित महिलेने 90 सप्टेंबरपर्यंत सर्व काही सहन केले . सततच्या छळाला कंटाळून पीडितेने तिचा त्रास तिच्या पतीला सांगितला त्यानंतर तक्रार देण्यासाठी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला धाव घेतली.
तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून IPC च्या संबंधित कलमे आरोपीविरोधात लावण्यात आली तसेच पुढील तपास सुरू केला आहे .