नागपूर : काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे चांगलेच अडचणीत सापडले आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता वडेट्टीवार यांच्यावर नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय बोकाडे यांच्या तक्रारीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या हत्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करत त्यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाशी संबंध जोडत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या बद्दलही आरोप केले होते.
त्यानंतर भाजपच्या विधी सेलने वडेट्टीवार असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग करत असून समाजात तेढ निर्माण करत आहे अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.
अदखलपात्र गुन्ह्याची नोंदयाच तक्रारीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडेट्टीवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.