हिंगोली : ‘ओबीसी एल्गार मेळावा’ हिंगोली येथे नुकताच पार पडला. या मेळाव्यात ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी चितावणीखोर वक्तव्य केले. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद ठेवा, असे तायवाडे भाषणादरम्यान म्हणाले.
तायवाडे यांच्या विधानानंतर त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (३० डिसेंबर) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला. मराठा-ओबीसी वाद सुरू असता तायवाडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने समाजबांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
हिंगोलीतील भाषणात तायवाडे यांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली. आतापर्यंत आम्ही गप्प होतो. शांत पद्धतीनं जगणारे आम्ही लोक आहोत. ओबीसी विरोधात कुणी बोलण्याची हिंमत केली, तर त्याचे हात-पाय कापून ठेवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. ४०० जातींचे ६० टक्के लोक महाराष्ट्रात आहेत. आमचा अपमान कदापिही सहन करणार नाही, असा घणाघात तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर केला होता.