Published On : Thu, Dec 14th, 2023

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांच्या ‘युवा संघर्ष’विरुद्ध नागपुरात गुन्हा दाखल

Advertisement

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात युवा संघर्ष यात्रा नागपुरात पोहोचल्यानंतर त्यांनी विधान भवनावर धडक मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पोलिसांची रोहित पवार यांच्यासह आंदोलकांसोबात बाचाबाची झाली. यावेळी पोलिस आणि आंदोलक यांच्यात प्रचंड झटापट झाली. सुमारे एक तासापर्यंत पोलिस आणि आंदोलन यांच्या संघर्ष सुरू होता.

मोर्चा पॉईंटवर निर्माण झालेल्या या तणावानंतर तेथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अतिरिक्त कुमक मागवत आमदार रोहित पवार, सलील देशमुख, रोहित पाटील आणि दुनेश्वर पेठे यांच्यासह युवा संघर्ष यात्रेतील 67 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

Advertisement

ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना दाभा गावाजवळ सायंकाळी मुक्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी मोर्चा पॉईंटवरील सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दुनेश्वर पेठे व त्यांचे कार्यकर्ते यांनी विनाकारण आक्रमक भूमिका घेतल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे मोर्चा पॉईंटपासून काही अंतरावरच असलेल्या सीताबर्डी पोलिस ठाण्यात पेठे व त्यांच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आमदार रोहित पवार यांच्यासह देशमुख आणि पाटील यांची नावे मात्र एफआयआरमध्ये नाहीत.