नागपूर : महिला सहकाऱ्याचा विनयभंग आणि तिला जातीवाचक अपशब्द वापरल्याच्या आरोपाखाली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या अधिकाऱ्याने 12 मार्च 2022 ते 19 मे 2023 दरम्यान महिलेचा छळ केला.
आरटीओमध्ये अधिकारी असलेल्या पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, सीताबर्डी पोलिसांनी आरोपी उप आरटीओ अधिकारी, रवींद्र शालिग्राम भुयार (रहिवासी, गॅलेक्सी अपार्टमेंट, रवी नगर, अंबाझरी, नागपूर),यांच्यावर कलम 354A, 509, 294, 506, आयपी 3(1)(r) आणि कलम 3(1) (s), 3 ( 2) नुसार ॲट्रॉसिटी कायद्यातील )(va) अंतर्गत गुन्हा दखल केला आहे.
पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, आरोपी भुयार तिला विनाकारण आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन करायचा. तो जबरदस्तीने आपल्या फोनवर तिला अश्लील व्हिडिओ दाखवायचा . पीडितेने याचा विरोध केल्याने तो तिला जातीवाचक शिवीगाळ करत असे.
तिच्या विरोधाला नाराज होऊन, जेव्हा पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली, तेव्हा भुयारने अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोकडे तक्रार (ACB) करण्याची धमकी दिली. सततच्या छळाला कंटाळून पीडितेने २४ जुलै रोजी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.