नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून उफाळललेल्या वादातून नागपूरच्या महाल परिसरात सोमवारी १७ मार्च रोजी हिंसाचार घडला. दंगलखोरांनी यादरम्यान अनेक वाहनांची तोडफोड, पोलिसांवर दगडफेक, ठिकठिकणी जाळपोळ करण्यात आली.
नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाईंड फहीम खान असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून फहीमच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फहीम खानसह 50 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यामध्ये पोलिसांनी सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. नागपूर सायबर पोलिसांनी मध्यरात्री हा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. या हिंसाचाराच्या तपासात अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत. हिंसाचाराला कारणीभूत ठरलेले व्हिडिओ इतर देशातील आहेत. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले आहेत. बांग्लादेश आणि इतर देशातील IP अड्रेसवरुन हे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले.
172 व्हिडिओंचा IP अड्रेस आणि मोबाइल नंबरचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. इयत्ता दहावीपर्यंत फहीम खान याचं शिक्षण झालय. सध्या तो 38 वर्षांचा आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खान यानेच नागपुरात दंगल भडकवल्याचे बोलले जात आहे.