Advertisement
नागपूर : नागपुरातील केडीके कॉलेजच्या प्रयोगशाळेत चक्क कोब्रा साप निघाल्याने सर्वत्र खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटीचे सर्पमित्र नितीश भांदक यांनी कोब्राची सुटका केली. अनुभव व कौशल्य पणाला लावून विषारी नागाला पकडून बरणी बंद केले. केडीके कॉलेजच्या प्रयोगशाळेतील प्राध्यापक आणि सदस्यांनी सुटकेचा श्वास घेतला. दुर्दैवाने तो सापाने कुणालाही चावा घेतला नाही.
दरम्यान सापाच्या दंशाने नव्हे तर साप चावल्याच्या भीतीनेच काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. मुख्य म्हणजे सर्पदंश झाल्यावर वेळीच उपचार केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता पावसाळा जवळ आला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांत साप सर्वाधिक प्रमाणात दिसून येतात.