नागपूर:राज्य परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या x वरील अकाउंट तसेच एमपीएससी समन्वय समिती या नावाने असलेल्या फेसबुक अकाऊंटवरून सरकारी नोकरीसह परिक्षासंदर्भात फेक नरेटिव्ह पसरविण्यात येत आहे. यामाध्यमातून सर्वसामान्य जनतेत आणि विशेष करून युवा व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे.याप्रकरणी नागपूरचा बेलतरोडी पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ऍडव्होकेट गजानन मोहिते,( रा. ११, काचोरे लेआउट, मनीष नगर )असे तक्रारदराचे नाव आहे. आपल्या तक्रारमध्ये मोहिते म्हणाले की, या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये अणि युवकांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्रास होईल. सामान्य जनतेची गैरसोय होईल अशा दृष्टिकोनातून आणि त्यामुळे राज्यात आरादत्तेचे वातावरण निर्माण होऊन राज्यातील शांतता भंग होईल या उद्देशाने, हे बेकायदेशीर कृत्य केले आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तींचा सहभाग आहे. हे सर्व कृत्य करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे मोहिते यांनी तक्रारीत म्हटले आहे. भारतीय न्याय संहिताच्या कलमाचे उल्लंघन केले आहे. म्हणून आपण प्रकरणाशी संबधित आरोपींवर भारतीय दंड संविधानच्या अंतर्गत अणि विशेष माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६.अ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार मोहिते यांनी बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये केली.
Published On :
Wed, Jul 3rd, 2024
By Nagpur Today
सरकारी नोकरीसह परिक्षासंदर्भात फेक नरेटिव्ह पसरवणाऱ्यांविरोधात बेलतरोडी पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल
Advertisement