रामटेक – रामटेक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना मंद गतीने आपला विस्तार करत असून नगरधन ,हिवरा बाजार ,रामटेक आणि आता मनसर येथेही 60 वर्षीय कोरोना रुग्ण आढळून आला.
प्रशासनाला माहिती मिळताच मन्सर येथील वॉर्ड क्रमांक पाच मधील कोरोना रुग्ण आढळलेला परिसर सील करण्यात आला.
सदर रुग्ण मेडिकल कॉलेज नागपूर येथे ऍडमिट असून त्याचा मनसर येथील नागरिकांशी जास्त प्रमाणात संपर्क आला नाही.
सदर माहितीनुसार, रुग्णाच्या मुलीचे लग्न 1 जुलै ला होते आणि वरात नागपूर वरून आलेली होती, रुग्ण आधी पासून आजारी असल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना सरपंच योगेश्वरी हेमराज चोखान्द्रे यांच्यामार्गदर्शनात करीत असून पोलीस, महसूल,आरोग्य यंत्रणा ही कार्यरत आहे.सर्व दुकाने तीन दिवस बंद असून फक्त दवाखाने व फार्मसी सुरू राहणार आहे.
मनसर ग्रामपंचायत , उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे , तहीलदार बाळा साहेब मस्के, वैदकिय अधीक्षक डॉ प्रकाश उजगरे,
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नाईकवार, परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.