Published On : Wed, May 1st, 2024
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्रात वखवखलेला आत्मा फिरतो; उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ताशेरे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. त्यावर उत्तर देत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. महाविकास आघाडीचे दोन उमेदवार रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी पुण्यात सभा घेतली. शरद पवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेत्यांनी सभेत भाषणं केली. या सभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख वखवखलेला आत्मा असा केला. आज तुम्हाला सांगू इच्छितो जसा अतृप्त आत्मा असतो तसा वखवखलेला आत्माही असतो. वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतो आहे.

वखवखलेला हा आत्मा सगळीकडे जातो आणि शरद पवार त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करु इच्छितात, मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतो आहे असं सांगतो. हे मात्र स्वतःसाठी लढत आहे. मी, माझं, माझ्यासाठी आणि सगळी कामं मित्रांसाठी असं यांचं धोरण. आम्ही मुलांसाठी लढतो आहोत त्यांना मुख्यमंत्री करायचं की नाही ते जनता ठरवेल. हा वखवखलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय. या वखवखलेल्या आत्म्याला थोड्या जरी संवेदना असतील तर जिथे फिरताय तिथे तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे आणि घरांकडे बघा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र भोळा आहे, साधा आहे, दिलदार आहे. मात्र महाराष्ट्र कृतघ्न आणि गद्दार नाही. महाराष्ट्राची परंपरा शूरांना वंदन करण्याची आहे. शूरा मी वंदिले असं गाणं आहे. भाजपाचं मात्र चोरा मी वंदिले असं चाललं आहे. मोदींना माहीत असेल किंवा नसेल पण असाच एक वखवखलेला आत्मा ३५० वर्षांपूर्वी गुजरातमध्ये जन्माला आला होता. तो म्हणजे औरंगजेब जो महाराष्ट्रावर चाल करुन आला होता.

हिंदवी स्वराज्य चिरडायला आणि महाराष्ट्र आपल्या ताब्यात घ्यायला तो आला होता. २७ वर्षे तो महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. त्याने आग्रा नंतर पाहिलाच नाही त्या औरंगजेबाचा आत्मा अजूनही भटकत असेल. इतकी वखवख बरी नाही,अशा शब्दात ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

Advertisement