कोरोना नियमांचे उल्लंघन
नागपूर, : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (२२ फेब्रुवारी) रोजी चिटणवीस सेंटर, सिविल लाईन्स मध्ये ए.आर.जी.क्रिएशन प्रदर्शनीला कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबददल रु. २५ हजार चा दंड वसूल केला. क्रिएशन चे श्री. अंकित अग्रवाल यांनी शोध पथकाला दंडापोटी रु. २५,००० चा धनादेश सुपुर्द केला.
उपद्रव शोध पथकाला गुप्त सूचना मिळाली होती की चिटणवीस सेंटरच्या प्रदर्शनी मध्ये मोठया संख्येने नागरिक खरेदीसाठी आले आहे. कोरोना नियमांचा भंग केला जात आहे, सामाजिक अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे शोध पथकाचे प्रमुख श्री. बिरसेन तांबे यांनी धरमपेठ झोन चे जवानांना ताबडतोब कारवाई करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.