नागपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. इतवारी परिसरात लोहाओळींमध्ये एका रंगाच्या (पेंट) दुकानाला पहाटेच्या सुमारास आग लागल्याने यात कोट्यवधींचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन विभागाच्या घटनास्थळी सात गाड्या पोहोचल्यानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.
माहितीनुसार, इतवारी परिसरात लोहा ओळीमध्ये फकदुद्दीन हसरअली आणि ब्रदर्स नावाचे पेंटचे दुकान आहे. सकाळी पाचच्या सुमारास दुकान बंद असताना आतमधून धूर दिसू लागला. याबाबत एका व्यक्तीने अग्निशामन विभागाला माहिती दिली. दुकानांमध्ये केमिकल पदार्थ असल्यामुळे आग झपाट्याने पसरली.
घटनास्थळी जाण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे अग्निशामन विभागाला सुरुवातीला आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामन विभागला यश आहे. नेमकी आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.