Advertisement
नागपुर: आज सकाळी पोलीस आयुक्त कार्यालय,नागपूर शहर येथे मा.प्रभारी सह. पोलीस आयुक्त डॉ. श्री. निलेश भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम समारंभ पार पडला.
सदर कार्यक्रमा दरम्यान नागपूर शहरातील कार्यरत केंद्रीय पोलीस पदक प्राप्त व पोलीस महासंचालक पदक प्राप्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.सदरवेळी मा.पोलीस उपायुक्त, (मुख्यालय) श्री. गजानन राजमाने व सर्व सहा.पोलीस आयुक्त, वरिष्ठ पो.निरिक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होता