Advertisement
नागपूर : नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गोधनी रेल्वे परिसरात मित्रानेचमित्रावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. नुकसानीच्या भरपाईबाबत सुरू असलेल्या वादातून तरुणाने हा हल्ला केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली.
दीप हरी खरे असे आरोपी तरुणाचे नाव असून जखमी तरुणाचे नाव प्रफुल्ल महादेवराव दांडेकर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दीप आणि प्रफुल चांगले मित्र होते. सुमारे दीड वर्षांपूर्वी प्रफुलने काही कामानिमित्त दीपची मोटारसायकल उधार घेतली होती. मात्र त्याची दुचाकी चोरीला गेली होती.
तेव्हापासून दीप त्याच्याकडे दुचाकी हरवल्याबद्दल भरपाईची मागणी करत होता. घटनेच्या रात्री त्यांच्यात या मुद्द्यावरून वाद होऊन प्रफुलला गुप्तीने मारहाण करून जखमी करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.