Advertisement
नागपूर : शहरात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अनेक गुंड आणि टोळ्यामध्ये टोळी युद्ध सुरू आहे. यातून एकमेकांना ठार मारण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. अशीच एक घटना आज नागपुरातील मानेवाडा चौकात दिवसाढवळ्या घडली.
मानेवाडा पेट्रोल पंपाजवळ एका बाह्य गुंड सूरज बिहारी उर्फ सूरज मेहतो याला नितीन गुप्ता नावाच्या व्यक्तीने ठार केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दुपारी दिली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि नितीन हे दोघेही कुख्यात गुंड असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत.