Advertisement
नागपूर : कन्हान पोलिस स्टेशन अंतर्गत किरकोळ वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. अमित नारायण भोयर असे आरोपी पतीचे नाव असून दुलेश्वरी अमित भोयर (वय 27 वर्ष) असे मृत पत्नीचे नाव आहे.
माहितीनुसार अमित आणि दुलेश्वरीच्या लग्नाला दिढ वर्ष पूर्ण झाले होते. त्यांना दहा महिन्याची मुलगीही आहे. कन्हान पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.