नागपूर : मानकापूर संकुलात एका मजुराला मारहाण करून त्याचा मोबाईल व रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.अर्जुन देव गिरी आणि स्वप्नील चव्हाण असे आरोपींचे नाव आहे. तर अन्य फ फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
माहितीनुसार,मानकापूर येथील पीडित सचिन कवडकर हा झिंगाबाई टाकळी येथील दुकानातून कामासाठी मजूर घेऊन जात होता. पीडित आणि आरोपींची आगोदर पासूनच ओळखी होती.
आम्ही तुला मंडप बांधण्याचे काम दिले होते, तू ते का केले नाहीस? यावरून वाद होऊन आरोपींनी सचिनला मारहाण करण्यास सुरुवात केली.दरम्यान सचिनच्या खिशातील दोन हजार रुपये व मोबाईल हिसकावून आरोपी फरार झाले.सचिनच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपीला अटक केली. तसेच पुढील तपास सुरु केला आहे.