नागपूर :राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारने पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवर बदल्या केल्या आहेत.राज्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी देण्यात आले आहेत.
‘या’ अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी झाल्या बदल्या:
सोनिया सेठी, IAS (1994) यांची प्रधान सचिव (R&R), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रुपिंदर सिंग, IAS (1996) यांची निवासी आयुक्त आणि प्रधान सचिव, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गोरक्ष गाडीलकर, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, वर्धा यांची संचालक, रेशीम, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकाश बी.खपले, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, नांदेड यांची महाडीस्कॉम, औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अविनाश पाठक, IAS (2013) अतिरिक्त विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गुलाब आर.खरात, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, जळगाव यांची व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वास प्रकल्प, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रविणकुमार देवरे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, पुणे यांची संचालक, OBC बहुजन कल्याण, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मिलिंदकुमार डब्लू.साळवे, IAS (2013) अध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती, गडचिरोली यांची सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सतीशकुमार डी. खडके, IAS (2014) मुख्य भूमापन अधिकारी, सिडको, नवी मुंबई यांची महानगर आयुक्त, नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय एस. काटकर, IAS (2014) उपायुक्त (महसूल), नाशिक विभाग, नाशिक यांची सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.