नागपूर:केंद्रिय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर या पदावर अधिकारी असल्याचे भासवून गुंतवणुकीच्या नावावर नागपूरातील एका व्यक्तीची ४८ लाख ८५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.सुनिल वसंतराव कुहीकर (प्लॉट नं ५०२, एम्पिरियल बिल्डिंग, जयताळा ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अनिरुध्द आनंदकुमार होशिंग (रा. के-२२/८८ ब्रम्हाघाट, विश्वेश्वरगंज, वाराणसी,उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.राणा प्रतापनगर पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनूसार, १ ते २५ऑक्टोबर दरम्यानआरोपीने गुंतवणुकदारांना तो केंद्रिय पर्यटन मंत्रालयात जनरल डायरेक्टर या पदावर अधिकारी असल्याचे भासवले तसेच केंद्रिय मंत्रालयातील वरीष्ठ नेत्यांचे उत्तर प्रदेश राज्य सरकार येथील वरीष्ठ नेत्यांचे तसेच केंद्रिय . वरीष्ठ अधिकारी व बॉलीवुड सिनेसृष्टितील काही प्रसिद्ध कलाकारांची नावे असलेल्या बनावट पत्रिका तयार करून त्या फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना वाटप करून त्यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. कोणताही आर्थिक परतावा न देता त्यांनी गुंतवणुक केलेली रक्कम फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना अद्याप पावेतो परत केलेली नाही.
यावरून आरोपी याने तो केंद्रिय पर्यटन विभागातील अधिकारी असल्याचे फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना भासवून त्याच्याशी तोतयागिरी करून भारत सरकारच्या अधिन मंत्रालयाची बनावट पत्रिका तयार करून फिर्यादी कुहिकर याल त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
याप्रकरणाची गंभीर दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने राणा प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये अप क. ३८७/२०२३ क. ४०९,४१९,४२०, ४६५,४६८ भा.दं.वि. सहकलम MPID Act ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला.