नागपूर – राजाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी आज प्रधानमंत्री आवास योजना, ॲग्रीस्टॅक आणि अनुभव पहल या योजना तसेच उपक्रमांचा आढावा घेतला. या बैठकीला दूरदृष्टी प्रणाली द्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह महसूल यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.