Published On : Mon, Jul 31st, 2023

मोहरममध्ये नागपूरच्या बाहेर असलेल्या राज दरबारात घडला चमत्कार, नागरिक झाले हैराण

Advertisement

नागपूर : ‘मोहरम’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लिम बांधव या दिवशी शोक व्यक्त करतात. यंदा २९ जुलैला मोहरम होता. यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी जुलूस काढला जातो.

मोहरमच्या पवित्र महिन्यात नागपूरच्या बाहेर असलेल्या राज दरबारात अल्लाहने करिष्माच्या रूपात आपली उपस्थिती सिद्ध केल्याचे बोलले जात आहे. खापरखेडा जवळील बिनासंगम गावातील हा राजदरबार आहे.अली म्हणजे इमाम हुसेन जो करबलाच्या मैदानात शहीद झाला, तोच अली ज्याचे इस्लामी शौर्य, इस्लामी संघर्ष आणि इस्लामिक बलिदान हे त्याचे प्रतीक मानले जाते. त्याच्याच चिन्हाने बनवलेला ध्वज कुणीही न हलवता, वार्‍याशिवाय आपोआप हलायला लागल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. या चमत्कारीक घटनेचा व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

हा सगळा प्रकार पाहणाऱ्या लोकांनी त्यादरम्यान अलीच्या नावाचा जयघोष सुरू केला. या दरबारात दर गुरुवारी हजारो लोक आपल्या समस्या घेऊन राज बाबांच्या भेटीसाठी येतात. चमत्कारिकरित्या त्यांना आरामही मिळतो. अनेक इस्लामिक तज्ज्ञ अलीचा मोठा ध्वज याच दरबारात आपोआप कसा हलला या मागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.