कामठी:-राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना च्या पाश्वरभूमीवर जीवन सुरक्षा विमा कवच लागू करावे , सर्व संवर्गातील पदोन्नती तात्काळ देण्यात यावी यासारख्या विविध न्यायिक मागण्यासाठी राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसीय लेखनिबंद आंदोलन पुकारले असून या लेखनिबंद आंदोलनातून मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्ट पासून बेमुद्दत आंदोलन पूकारण्यात येणार आहे
या पाश्वरभूमीवर आज 28 जुलै ला कामठी येथील दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालय येथे एक दिवसीय लेखनिबंद आंदोलन करण्यात पुकारण्यात आल्याने कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प राहले परिणामी कार्यालय फक्त नामधारी उघडकीस राहून कुठलेही कार्यालयीन कामे न झाल्याने या एक दिवसीय लेखनिबंद आंदोलनाचा विभागाला चांगलाच फटका पडला. तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाच्या पवित्रात्मक धोरणातून येत्या 4 ऑगस्ट पासून बेमुद्दत आंदोलन पुकारण्यात येणार असल्याची माहिती दुय्यम निबंधक कपले यांनी दिली
आजच्या या लेखनिबंद आंदोलनातून केलेल्या मागण्यात सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ भरण्यात याव्या, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याची पदे वी वीभागातुन पदोन्नतीने भरण्यात यावे, रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे, कोविड 19 मुळे मयत झालेले अधिकारी कर्मचारी यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत करण्यात यावी व त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी, विभागातील अधिकारी कर्मचारी यांना 50 लाख रुपयांचा विमा कवच देण्यात यावे, पी एल ए ची रक्कम विभागातील कार्यालयाच्या व जनतेच्या सुविधांसाठी वॊपरण्यात यावी , तुकडेबंदी रेस कायद्यांनव्ये झालेल्या कारवाह्या मागे घेण्यात याव्या , सहा दुय्यम निबंधक वर्ग 2 व दुय्यम निबंधक श्रेणी 1 संवर्गाचे एकत्रीकरण करण्यात यावे हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाच पुरविण्यात यावे, निनावी तक्रारीबाबत कारवाही करण्यात येऊ नये , पदनामा मध्ये बदल करणयात यावा अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
संदीप कांबळे कामठी