कामठी :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वरभूमीवर प्रशासकीय बदली यादीनुसार जुनी कामठी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तालय विशेष शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त ठिकाणी त्याच पोलीस स्टेशन चे दुय्यम पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांची नियुक्ती करण्यात आली.
यानुसार काल जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे आयोजित निरोप व स्वागत कार्यक्रमात बदली झालेले तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला तर नवनियुक्त ठाणेदार म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, प्रवीण घुगल, समाधान पांढरे, किशोर मालोकर, अश्वजित फुले, अश्विन साखरकर, दीप्ती, स्वाती चटोले, सुभाष गजभिये, ढगे, पिल्ले , धर्मेंद्र राऊत, आदी उपस्थित होते.