कामठीत पॉजोटिव्ह रुग्णांची संख्या शून्य, 42 नागरिकांची दुसऱ्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा
14 नागरिक होम कोरोनटाईन
कामठी:-कोरोना व्हायरस च्या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात जमावबंदी कायद्यासह लॉकडाउन लागू आहे . दरम्यान प्रभाग क्र 16 येथील एक तरुण नागरिक कोरोनाबधित आढळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करोत 12 एप्रिल ला या तरुणाला नागपूर येथे शासकीय विलीगीकरण कक्षात हलविण्यात आले होते या रुग्णाचा 14 दिवसाचा अलगिकरण कालावधी संपला असून याच्या दोन्ही तपासणी अहवालात नेगेटिव्ह रिपोर्ट आल्याने सदर तरुण कोरोना बाधित पासून मुक्त झाले यानुसार या तरुणाला त्याच्या स्वगृही प्रभाग क्र 16 येथील लुम्बिनी नगर येथे पोहोच केले असता उपस्थित आरोग्य विभाग तसेच पोलीस विभागाच्या वतीने या तरुणाचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले असले तरी या तरुणाला पुढचे 14 दिवस होम कोरोनटाईन म्हणूनच राहण्याचे सांगण्यात आले तसेच
या प्रभागातील 42 नागरिक हे नागपूर च्या शासकीय विलीगिकरण कक्षात हलाविन्यात आले असून सात दिवसापूर्वी या सर्वाचा प्राथमिक कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असला तरी दुसरा अहवाल प्रतिक्षेत आहे तरीसुद्धा सुरक्षात्मक दृष्टिकोनातुन सदर परिसर पुढच्या 10 मे पर्यंत प्रतिबंधित करण्यात आले आहे.यानुसार कामठी शहरातील कोरोना बधितांची संख्या ही शून्य असून गृह विलीगिकरण कक्षाची संख्या ही 14 तर शासकीय विलीगिकरण कक्षाची संख्या ही 42 आहे यानुसार संशयित कोरोनाची संख्या अब तक छप्पन आहे.
कामठी तालुका प्रशासनाच्या वतीने केलेल्या अथक परिश्रम तसेच उपाययोजनेतून शहर सध्या सुरक्षित झोन मध्ये आला असून कोरोना पोजिटिव्ह रुग्णांची संख्या शुन्य आल्याने प्रतीक्षेत असलेल्या 56 नागरिकाचे अंतिम तपासणी अहवाल लवकरच येणार असून कामठी शहर लवकरच कोरोना मुक्त होणार असल्याने तालुका प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.
संदीप कांबळे कामठी