नागपूर : शहरातील एमआयडीसी परिसरात शांतिनिकेतन शाळेजवळ पोलीस मित्र असलेल्या एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाला आहे.राकेश मिश्रा असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी बारा उर्फ पिसा याने त्याच्या साथीदारांसह मिश्रा वर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती आहे. पीडित मिश्रा याची प्रकृती नाजूक असल्याचे समोर येत आहे. तसेच यात त्याचा मृत्यू होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
एमआयडीसी पोलिसांनी या घटनेसंदर्भात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.