सध्याचा उन्हाळ्यातील वाढता उष्मा, तापत उन्ह आणि भर दुपारच्या वेळी या रणरणत्या उन्हात चौका चौकात वाहतूक सिग्नलवर नियम इमानदारीने पाळणाऱ्यांना एक ते दोन_तीन मिनिट थांबावं लागत, त्याचा प्रचंड त्रास त्यांना होतो,
हे बघून भाजप सहकार आघाडी नागपूर महानगरातर्फे, आज वाहतूक सहआयुक्त, नागपूर शहर, सिव्हिल लाईन्स येथील कार्यालयात एक निवेदन देण्यात आले त्यात मागणी केली आहे की, “या प्रत्येक गर्दीच्या ठिकाणच्या चौकात लोकांना असा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर चारही बाजूने ग्रीन नेट लावाव्या व उन्हाच्या वेळेला दुपारी सिग्लनची वेळ कमी सेकंदाची करावी”
याप्रसंगी भाजप सहकार आघाडी, नागपूरचे अध्यक्ष किशोर भागडे, महामंत्री अनिल देव, संपर्क प्रमुख श्रुती देशपांडे, उपाध्यक्ष डॉ शशांक डोंगरावर, डॉ आनंद नाशिककर, विधी सल्लागार ऍड अशोक रघूते, सुरेश डोंगे, महिला प्रमुख नलिनी वंजारी, चैताली भस्मे, रितीक वंजारी प्रामुख्याने उपस्थित होते.