Advertisement
नागपूर : गिट्टीखदान भागातील जाफर नगर येथील मदरशाच्या चौथ्या मजल्यावरून पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून मुलाच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्याला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.
मोहम्मद निजाम अब्दुल हफीज अन्सारी (7) हा जामिया हुसैनिया मदरसा, आदर्श कॉलनी, जाफर नगर, न्यू मानकापूर येथे शिकत होता.
दुपारी 1.25 च्या सुमारास तो मित्रांसोबत खेळत होता.अचानक तोल गेल्याने तो इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडला. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद निजाम याला तात्काळ क्रिटीझोन हॉस्पिटल, प्रशांत नगर, पोलिस लाईन टाकळी येथे नेण्यात आले, यादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.