1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांनी म्हणजे 22 ऑक्टोबर 1951 ला दादांचा जन्म झाला. वडील केशवराव नालमवार व्यवसायाने वकील होते, आईचे नाव समता ताई.लहानपणी नटखट असलेले दादा आई-वडिलांच्या आणि आप्तेष्टांच्या सानिध्यात हळूहळू मोठे होऊ लागले. सामाजिक आणि राजकीय क्रांतीची बीजे घरातच पेरली गेली असल्यामुळे, घरच्यांनी दादाच्या नावाला क्रांती या शब्दाची झालर देऊन सर्वांचे “भाऊ,,’ बनवले मग दादांचे नाव ‘क्रांतीभाऊ’म्हणून सर्व मान्य झाले. जनमानसात आणि शाळेत सुद्धा क्रांती भाऊ या नावाने सुपरीचित झाले.
क्रांती भाऊंचे प्राथमिक शिक्षण. ………… येथे झाले. त्यानंतरचे महाविद्यालयीन शिक्षण. कॉमर्स मधून………….. येथून भाऊंनी पूर्ण केले. भाऊ जसजसे मोठे होत होते. तसतसे आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे व परिस्थितीचे अवलोकन करीत होते. समाज माणसात घडत असणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीचे अनुभव जवळून पहात असताना त्यांच्या मनात एका गोष्टीने घर केले.
की, घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टी जेवढ्या दूरपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या दूरपर्यंत आपण कोणत्या माध्यमातून पोहोचू शकतो, या विचाराने त्यांच्या मनात थैमान घातले होते, त्यावर त्यांनीच रामबाण उपाय शोधून काढला आणि वर्तमानपत्र काढण्याचा पूर्णपणे विचार केला. त्या काळात ही गोष्ट एवढी साधी नव्हती, परंतु विपरीत परिस्थितीत त्यांनी केलेल्या विचाराला प्रत्यक्षात उतरविणे ही एक गोष्ट मनाशी बांधून क्रांतीभाऊंनी सन 19 फेब्रुवारी 1973 ला,”दैनिक महाविदर्भ ‘या नावाने चंद्रपुरात वृत्तपत्र सुरू केले.
या वृत्तपत्राची प्रबंध संपादक म्हणून जबाबदारी भाऊंनी समर्थपणे पेलली, भाऊंच्या अथक परिश्रमाने दैनिक महाविदर्भ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात कोळशाच्या खाणीतील हिराच ठरले. या दैनिकाचा वाचक वर्ग खूप वाढला. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या क्रांतीभाऊंचे स्वप्न दैनिक महाविदर्भ या वृत्तपत्राच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले होते. परंतु त्या काळात दैनिक महाविदर्भ सारखे वृत्तपत्र वाचकांच्या हातात पडले खरे, पण खाच खळग्यांनी भरलेल्या दैनिक महाविदर्भच्या रस्त्याला गुळगुळीत करण्याचे काम
क्रांतीभाऊ नी केले. भाऊंचा जीवन प्रवास पाहिजे तेवढा सोपा नव्हता . विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भाऊंनी जनता कॉलेज चंद्रपूर येथे विद्यार्थी युनियन मध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. त्या काळात अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले.
“दैनिक महाविदर्भ’विदर्भाच्या मातीत रुळावे म्हणून दैनिक महाविदर्भच्या रेषा आणखी मोठ्या करण्याचा प्रयत्न क्रांती भाऊंनी केला व 5 जानेवारी 1981 ला,” दैनिक सांध्य महाविदर्भ”नागपूर येथून प्रकाशित केले. सांध्य दैनिक म्हणून लोकांनी हातो हात दैनिक महाविदर्भला डोक्यावर घेतले. त्याचबरोबर 26 जानेवारी 1983 ला”दैनिक सकाळ महाविदर्भ”सुरू केले. या दोन्ही वृत्तपत्राचे प्रबंध संपादक म्हणून भाऊंनी 1993 साली .काम पाहिले.मराठीचा वाचक वर्ग वाढत असल्याने क्रांती भाऊंनी हिंदी भाषिक लोकांसाठी 1990 ला”दैनिक हिंदी महाविदर्भ”चंद्रपूर येथून प्रकाशित केले.
गृह रक्षक दलाचे जिल्हा समादेशक म्हणून 1981 साली पदभार सांभाळला. 1993 साली.”दैनिक आपला महाविदर्भ,”व “दैनिक अपना महाविदर्भ’ हे अमरावती येथून एकाच दिवशी सुरू केल्याने “लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, मध्ये नोंद घेऊन क्रांती भाऊंनी आपल्या कार्याची अमिट छाप सोडली,’क्रांतीभाऊ नालमवार यांना,”मानवाधिकार’या पदवीने याच काळात सन्मानित करण्यात आले,”समाज गौरव”हा पुरस्कार नागपुरातील जातीय सलोखा परिषदयाच व श्री भाऊसाहेब मुळक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन केला.
ही गोष्ट भाऊंसाठी खूप मोठी होती. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येत असलेल्या”दर्पण पुरस्काराने”2015 ला सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर क्रांती भाऊंनी रोटरी क्लब, जय श्रीया क्लब, आर्य वैश्य समाज सेवानिधी, यांच्या माध्यमातून अतुलनिय समाज सेवा केली. त्यांनी पर्यावरण विषयी प्रेम असल्याची चुणूक दाखवून दिली एक लाख 11 हजार एकशे अकरा झाडे अख्ख्या चंद्रपूर शहरात लावून.”माझे चंद्रपूर हिरवेगार’अशी आख्यायिका सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमीच्या तोंडात होती. ती क्रांती भाऊंच्या पर्यावरण प्रेमामुळे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मनोनित सदस्य, चंद्रपूर औद्योगिक सहकार क्षेत्राचे संचालक, चंद्रपूर जिल्…