नागपूर– जागतिक महिला दिनानिमित्त अशोक गौर फॅन्स क्लब आणि पंचशील सिनेमा यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सध्या देशभर गाजत असलेला छावा चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन करण्यात आले.
शेकडो महिलांनी एकत्र येऊन ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट पाहिला आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या त्याग व पराक्रमाचे दर्शन घेतले. चित्रपट पाहताना महिलांनी महाराणी येसूबाई आणि राजमाता जिजाऊंच्या जयघोषाने सिनेमागृह दणाणून सोडले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रत्येक महिलेला गुलाबाचे फूल आणि हळदी-कुंकवाचा टिळा लावून त्यांचे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी महिलांनी गळाभेट घेत एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महिला दिनाच्या निमित्ताने ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून महिलांनी इतिहासाची उजळणी करत आपला विशेष दिवस साजरा केला.
या आयोजनासाठी पंचशील सिनेमाचे डायरेक्टर प्रतीक मुन्नोत , प्रमोद मुन्नोत,जनरल मॅनेजर राजा लहेरिया , रोहित जयस्वाल , आशिष मोते, सुरेश पटेल, पूजा लोंगे आणि संपर्क प्रमुख सन्नी भोंगाडे यांनी विशेष मेहनत घेतली.