नागपूर : शहरातील सुरेश भट्ट सभागृहात भाजपने आयोजित केलेल्या कामगार कल्याण योजनेच्या शिबिरात गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मनू तुळशीराम राजपूत (वय ६५ रा. आशीर्वाद नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.
भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम या व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी ही योजना काढण्यात आली आहे.
या योजनेअंर्गत बांधकाम कामगार लाभार्थी महिलांना गृहपयोगी वस्तू संच आणि ५००० रुपये महिना अशी आर्थिक मदत मिळणार होती. याकरिता शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी सुरेश भट्ट सभागृहात गर्दी केली होती. ५००० हजार नागरिक क्षमतेच्या सभागृहाबाहेर तब्बल ४० हजार महिला जमल्या होत्या. सकाळी पहाटेपासूनच महिला रांगेत लागला होत्या.अधिकाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजता सभागृहाचे दार उघडले असता महिलांनी आत प्रवेश करण्यास धडपड केली.यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला तर ४० महिला जखमी झाल्या आहेत, यासंदर्भात शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांनी ‘नागपूर टुडेशी’ बोलताना माहिती दिली.मृत महिलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात नेण्यात आला असून इतर जखमी महिलांवर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे.