Advertisement
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनमोल नगर येथील शिवाजी पार्क परिसरात मंगळवारी एका धक्कादायक घटनेमुळे स्थानिकांची खळबळ उडाली आहे. सात भटक्या कुत्र्यांनी घरासमोर एका तीन वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चिमुकल्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा मुलगा बाहेर खेळत असताना अचानकपणे भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. इतकेच नाही तर मुलाचे लचके तोडत त्याला घरसटत ओढून नेण्यास सुरुवात केली.
ही घटना एका महिलेच्या लक्षात आली आणि त्यांनी कुत्र्यांवर दगडफेक करून मुलाला वाचवले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाला कोणत्या रुग्णालयात दखल करण्यात आले यासंदर्भात कोणतीच माहिती समोर आली नाही.त्यामुळे त्या मुलाची ओळखही पटू शकली नाही.