Advertisement
नागपूर : शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मार्टिन नगर दाम्पत्यानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्यानी टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अनेक वर्षांपासून दाम्पत्याला मुलं बाळ होत नव्हते. यासोबतच बेरोजगारीच्या कारणांमुळेही दोघांनी हे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे आत्महत्या करण्याअगोदर दाम्पत्यानी व्हिडीओ बनवून व्हॅट्सअप स्टेटस ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
जरीपटका पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेच्या पुढील तपासाला सुरुवात केली आहे.