नागपूर: भारतीय स्वातंत्र लढयात आपल्या प्राणाची आहुती देण्या-या युवा स्वातंत्रता सेनानी शहीद शंकर महाले यांच्या बलीदान दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकातर्फे गांधीबाग झोन सभापती श्रीमती सुमेधा देशपांडे यांनी महाल झेंडा चौक स्थित शहीद शंकर महाले यांच्या पूर्णाकृती पुतळयाला माल्यार्पण करुन आदरांजली दिली. यावेळी शहीदाचे कार्याचे स्मरण करुन देण्यात आले.
याप्रसंगी स्मारक समितीचे शेषराव दुरगकर, इश्वरभाऊ चौधरी, त्रिबंकराव आगलावे, सरेश पवार, मारोतराव पोहेकर, प्रकाश भिसे, गंगाधर धुबे, वसंतराव माथने, वामनराव नांदुरकर, नामदेवराव मुटकरे, गुलाबराव राऊत, मानापुरे, दामोधराव भट्ट, मनोहरराव दिघे, अरुणराव खडंकर, काशीनाथ महले, सुर्यभानजी रामटेके, राजकुमार रामटेके, मनोहराव झगदळे आदी उपस्थित होते.