नागपूर : शहरातील काटोल नाका चौकात शनिवारी पहाटे सुसाट चाललेल्या ट्रकने पोलीस चौकीला धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे ट्रक चालवताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. चालकाने थेट पोलीस चौकीतच धडक दिली.
सुदैवाने, अपघाताच्या वेळी पोलीस चौकीच्या आत कोणीही नव्हते घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिसरात नाकेबंदी केली. ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा सविस्तर तपास करण्यात येत आहे.