नागपूर – राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पुन्हा एकदा खुलेआम अश्लील कृत्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बहुतांश व्हिडिओंमध्ये लोक कोणतीही भीती न बाळगता अश्लील कृत्य करताना दिसत असतात. शहरातील असाच आणखी एक व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला .यामध्ये एक जोडपे दुचाकीवरून अश्लील रीतीने रस्त्यावरून जाताना दिसत आहे. रस्त्यावरील इतर प्रवाशांनी मोबाईलवर याचा व्हिडिओ बनवला, जो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडिओ रविवारी पहाटेचा असल्याचे सांगण्यात येत असून रस्ता सुरक्षेच्या नियम धाब्यावर बसवून या जोडप्यांनी अशोभनीय कृत्य केल्याने सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर नागपुर पुलिस काय कारवाई करतील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.