Advertisement
नागपूर: गिट्टीखदान परिसरात महिलेने भरधाव कार चालवत तीन वाहनांना धडक दिली.या भीषण अपघातात रस्त्यावरील भाजी विक्रेते जखमी झाले आहेत.ही घटना गुरुवारी गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे.सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालक महिला फोनवर बोलत असताना आपली (कीआ सोनेट MH/31/FU/1821) ) गाडी चालवत होती.
अनेक वाहनांना धडक देऊन आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना जखमी करून ती फोनवर बोलत असतानाच कारमधून बाहेर पडली.
स्थानिक नागरिकांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी कार चालक महिलेला ताब्यात घेतले असून जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.