नागपूर : सलूनमध्ये काम करणाऱ्या महिलेवर एका नराधमाने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
याचदरम्यान गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. आरोपीने लग्नास नकार दिल्याने पीडितेने यशोधरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अक्षय देवराव कोटांगले असे ३० वर्षीय आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, पीडित२४ वर्षीय पीडित तरुणी शहरातील एका सलूनमध्ये काम करते.
ती विवाहित आहे पण वेगळी राहते. ती अक्षयला भेटली यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून वरांवर अक्षयने तरुणीवर बलात्कार केला.
याबाबत पीडितेने यशोधरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.