Advertisement
नागपूर : समृद्धी महामार्गाजवळ मंगळवारी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने हिंगणा परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा गळा चिरला होता. महिलेची हत्या करून तिचा मृतदेह महामर्गाच्या कडेला फेल्याचा पोलिसांना संशय आहे.
हिंगणा पोलीस ठाण्याचे पथक आणि झोन १ चे डीसीपी अनुराग जैन यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला आहे. शवविच्छेदन तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.