कामठी :-कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्हान-पिपरी रहिवासी तरुणाचे शेजारच्या मुलीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून तरुणाशी तरुणींच्या कुटुंबियांशी झालेल्या भांडणातून अपमानित झालेल्या तरुणाने कन्हान नदीच्या पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतक तरुणाचे नाव बादल उर्फ अतुल राजू खडसे वय 32 वर्षे रा कन्हान-पिपरी असे आहे.
जुनी कामठी पोलिसानी दिलेल्या माहोतीनुसार सदर मृतक तरुणाचे शेजारच्या तरुणीशी पाच वर्षांपूर्वी प्रेम होते या प्रेम संबंधाला तरुणींच्या घरच्यांचा विरोध असल्याने या तरुणींचे इतरत्र विवाह करण्यात आले.
आज ही तरुणी कन्हान-पिपरी येथील माहेरी आल्याची माहिती कळताच सदर तरुनाणे कशी बशी या विवाहित तरुणीशी हितगुज साधण्यासाठी भेट घेतली या भेटीची माहोती सदर तरुणींच्या घरच्यांना कळताच संतप्त झालेल्या या तरुणींच्या नातेवाईकानी सदर मृतक तरुणाला घरी बोलावून मारझोड केली या घटनेतून अपमानित झालेल्या तरुणाने मनावर घेतलेल्या रागाच्या भरात नजीकच्या कन्हान नदीच्या पुलाखाली उडी घेऊन आत्महत्या करून कायमची जीवणयात्रा संपवली . यासंदर्भात फिर्यादी अभय राजू खडसे ने स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. मृतकाच्या पाठीमागे आई, वडील, तीन भाऊ असा आप्तपरिवार आहे.
संदीप कांबळे कामठी