कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नया गोदाम येथे एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 4 दरम्यान उघडकीस आली असून मृतकाचे नाव धीरज प्रदीप राऊत वय 28 वर्षे रा नया गोदाम कामठी असे आहे.या मृतकाचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने ही घटना दोन दिवसांपूर्वी असल्याचे तर्क लावण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सदर मृतकाला दारूचे व्यसन असल्याने घरमंडळी कंटाळून बोरगाव ला वास्तव्यास होते तर सदर मृतक हा एकटाच घटनास्थळी घरात वास्तव्यास होता.आज या घरातुन कुजलेली वास बाहेर पसरल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली असता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.
पोलिसांनी त्वरित घटनास्थळाचा पंचनामा करीत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.,पोलिसांनी यासंदर्भात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे करीत आहेत