Advertisement
नागपूर : तरुणीवर बलात्कार करून मारहाण केल्याच्या आरोपाखाली वाठोडा पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. विशाल उर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता (21, रा. वाठोडा) असे आरोपीचे नाव आहे.
माहितीनुसार, ३१ मे ते २ जून दरम्यान आरोपीने बळजबरी २० वर्षीय तरुणीला वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे नेले. आरोपीने तरुणीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिने विरोध केला असता आरोपींनी तिलाही मारहाण केली आणि घडलेली घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुलीने हिंमत दाखवत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी वाठोडा पोलिसांकडे धाव घेतली.
वाठोडा पीएसआय चव्हाण यांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विशाल गुप्ताविरुद्ध भादंवि कलम 341, 363, 376(2)(एन), 323, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकले. पुढील तपास सुरू आहे.