Published On : Thu, Jul 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

आम आदमी पार्टी उत्तर नागपूर ने केले महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन

नागपूर : आज आम आदमी पार्टी उत्तर नागपूर विधानसभा मार्फत माहगाई विषयी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, संघटन मंत्री प्रदीप पौनीकर व कोषाध्यक्ष नरेश महाजन यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी प्रामुख्याने विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, नागपुर संघटनमंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकुलकर, युवा राज्य समिति सदस्य कृतल वेळेकर हे उपस्थित होते.

एका बाजूला लोक कोरोना काळातून नुकतेच बाहेर आले आहेत आणि त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. बेरोजगारी पासून त्रस्त झालेल्या या जनतेवर सरकारने जीवनावश्यक वस्तू वरती जीएसटी लावून एक मोठा बोजा टाकला आहे. अर्थव्यवस्था खालावलेली असल्यामुळे लोकांच्या वेतन पद्धतीत वाढ गोठवलेली आहे. सर्वसाधारण लोकांना जीवन जगणं अतिशय कठीण झालेला आहे.

Gold Rate
Saturday08 Feb. 2025
Gold 24 KT 85,100 /-
Gold 22 KT 79,100 /-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्याच उलट दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूवर कर लावणे जे आज पर्यंत इतिहासात कधी घडलेला नाही अशी गोष्ट आज केंद्र सरकारने करून दाखवली. जीवनावश्यक वस्तूवर कर लावून यांनी सिद्ध केले की हे जनतेच्या विरोधात कार्य करत आहेत. माननीय प्रधानमंत्री यांनी या आधी आपल्या गुजरातमधील वक्तव्यात म्हटले होते की जीएसटी हे जीवनावश्यक वस्तूंवर लागणार नाही, परंतु केंद्र सरकारने काही प्रमाणात का होईना जीएसटी जीवनावश्यक वस्तूंवर लावलेला आहे. ही जीएसटी लावायची सुरुवात आहे, आज जरी जीएसटी कमी प्रमाणात लावला आहे परंतु उद्या तो जीएसटी कधीही केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल प्रमाणे वाढवू शकते.

मोदी सरकार एकीकडे नवीन पार्लमेंट बिल्डिंग व मोदी जींचे नवीन ऑफिस दिल्लीमध्ये बनवत आहे ह्या सरकारच्या अनावश्यक खर्चाचा बोजा आम जनतेवर टॅक्स च्या रूपाने पडत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असूनही भारत सरकारचा त्यावरील कर कमी करायचा बेत दिसत नाही महाग डिझेल व पेट्रोल मुळे प्रत्येक गोष्टींच्या बाजारात किमती वाढलेल्या असून त्याचा बोजा आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या जनतेवर ती पडतो. ह्या निर्दयी मोदी सरकारचा आम आदमी पार्टी निषेध करते व जनतेला आवाहन करते की या निर्दय सरकार विरुद्ध मोठे जन आक्रोश आंदोलना मध्ये सामील व्हावे.

या वेळी सुनील मॅथ्यू, पियुष आकरे, गौतम कावरे, विजय नंदनवार पंकज मिश्रा, स्वप्नील सोमकुवर, पंकज मेश्राम, अमित दुराणी, मानसिंग अहिरवार, अमय नारवरे, शैलेश गजभिये,कल्यामेंट डेविड, शुभम मोरे, सतीश सोमकुंवर,संजय चन्देकर, अर्चना काले,अब्दुल सलाम,नासिर शेख,शुभम, अविनाश सोरके मोरे,प्रदीप वासनिक, प्रमोद चौदरी, जावेद मलादरी, असलम शेख नरेश देशमुख,प्रदीप पोनिकर,विजय नन्दनवर,अनिल शेम्बे,सुनील गजभिये, मीणा तानवानी, नानक दनवानी, हेमराज कुम्भरे,रजा अंसारी,प्रकाश दरवादे, विक्रम ठाकरे, अमृता मेश्राम, विजय वाद्य, राकेश अंबादे, कुणाल अंबादे, मंगल भिमटे, विक्की आहुजा, अर्चना राले, सूरज बोरकर, सुनिल बोरकर, शुभम डोंगरे, चैताली रामटेके, कविता सिंग, संतोष डोंगरे, ह्रितिक गजभिये, पियूष दहाट, दिपक गणवीर, सुहेल गणवीर, राकेश खोब्रागडे, रोहीत गणवीर, राहूल डोंगरे हे उपस्थित होते.

Advertisement