– उद्या 16 फेब्रूवारी ला शपतविधि सोहळा करणार साजरा
नागपुर– दिल्लीमध्ये गेल्या ५ वर्षांत केलेल्या जनाताभुमिख कामामुळे व सकारात्मक प्रचारामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमताने दिल्लीतील जनतेने निवडून दिले आहे.
उद्या रविवार दिनांक १६ फेब्रुवारी, २०२० रोजी आम आदमी पार्टी दिल्लीत सरकार बनवून आपले राष्ट्रीय संयोजक मा. अरविंद केजरीवाल जी सलग तिसऱ्या वेळी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारतील.
हा विजय *आम आदमी पार्टी* च्या दिल्ली सरकार कडून मागील ५ वर्षात केलेल्या कार्याचा विजय आहे. या मुळे देशातील सामाजिक व राजकीय समीकरणे बदलून फक्त ध्रुवीकरणाच्या माध्यमातून जाती – धर्माचे राजकारण चालणार नाही, तर लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवून काम करणाऱ्या राजकीय पक्षांनाच जनता स्वीकारेलं हा नवीन संदेश आम आदमी पार्टीने संपूर्ण भारतातील प्रस्थापित राजकीय पक्षांना दिला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने दिल्लीतील आम आदमी पार्टीचे शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामाची प्रशंसा करून त्याच पद्धतीचे काम महाराष्ट्र राज्यात करायची घोषणा केली आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्र या अत्यंत सकारात्मक राजकीय परिस्थितीत जनतेपर्यंत पार्टीची विचारधारा पोहोचवून येणाऱ्या काळातील सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहे.
आम आदमी पार्टीला नागपुरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आप ने शहरात मोठ्या प्रमाणात सदस्यता अभियान राबवायला सुरुवात केली असून मोठ्या चौकात, वस्त्यामध्ये जावून तसेच डिजिटल माध्यमातुन सदस्यता सुरु आहे.
उद्या, *रविवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२०* ला नागपुरात *संविधान चौकात* दिल्ली सरकारच्या शपत विधि समारोह सोहल्याचे सरळ प्रक्षेपण *सकाळी 10* वाजता दाखवून साजरा करण्यात येणार. तरी नागपुरात सगळ्या नागरिकांना व पत्रकार बंधवाना हार्दिक निमंत्रण देण्यात येत आहे.
दिल्लीत सकारात्मक राजकारण करून आम आदमी पार्टीने बनविलेले विकासाचे आदर्श मॉडेल पक्ष संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात पण राबविन्यात येणार. शिक्षण, पाणी, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण, रोजगार या क्षेत्रात भरीव काम करण्याचा निर्धार आप ने केला आहे.