नागपूर : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेचा निषेध म्हणून देशभरात आपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरातही त्याचे पडसाद दिसत असून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.
नागपुरातील गणेश पेठ परिसरातील नितीन गडकरी यांच्या मुख्य निवडणूक प्रचार कार्यालया बाहेर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत थेट कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, महिला यावेळी उपस्थित होत्या.आंदोलनासाठी परवानगी न घेतल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत धक्काबुक्की झाली. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानयेत गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या परिसरातही त्यांनी आंदोलन केले.