Published On : Mon, Jun 3rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘आपली बस’ची दुचाकीला धडक;वडिलांचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या भरधाव वेगात असलेल्या आपली बसने दुचाकीला धडक दिल्याने एका व्यक्तीची मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर त्याच व्यक्तीची मुलगी गंभीर जखमी झाली. शिवचरण भजेलाल धरनवार (५८,हंसापुरी )असे मृत व्यक्तीचे नाव असून अनुसुक्ता (१९) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.

माहितीनुसार, शिवचरण धरनवार हे शनिवारी सकाळी ८.३० वाजता आपली मुलगी अनुसुक्ता (१९) हिला मोटारसायकलवरून (एमएच ४९/क्यू-१९४७) तिच्या शिकवणी वर्गात सोडण्यासाठी जात असताना आपली बस (एमएच) -31/EN 0423) ने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या धडकेने वडील व मुलगी दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात (जीएमसीएचम) नेण्यात आले जेथे शिवचरणचा मृत्यू झाला. अनुसुक्तावर उपचार सुरू आहेत.

सीताबर्डी पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या कलम 184 सह आयपीसीच्या कलम 279, 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरु केला आहे.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement