Published On : Mon, Oct 2nd, 2023
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या सुपारी दलालाचे अपहरण; आरोपींकडून सिगारेटचे चटके देत अमानुष छळ !

तब्बल पाच महिन्यानंतर सुटका
Advertisement

नागपूर: शहरात हृदयद्रावक घटना समोर आली आहे.शहरातील सुपारी दलालाचे गेल्या पाच महिन्यांपासून अपहरण करून त्याचा तब्बल पाच महिने अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नानक सुहाराणी असे पीडित व्यक्तीचे नाव असून त्याला आरोपींनी बंदी बनवून त्याच्या संपूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके देत त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, पीडित नानक याने काही व्यापाऱ्यांना पैसे उधार दिले होते.तसेच त्याने काही हवाला आणि सुपारी व्यापाऱ्यांकडून पैसे उधार ही घेतले होते. 20 मे 2023 रोजी नानक हा नागपूरहून गुजरातला सुपारीचे पैसे आणण्यासाठी निघाला. मात्र पाच महिने उलटून गेले तरी तो आलाच नाही. मात्र यादरम्यान ती बेपत्ता झाल्याची तक्रार पीडित व्यक्तीच्या पत्नीने लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये दिली होती.

Gold Rate
16April 2025
Gold 24 KT 95,000/-
Gold 22 KT 88,400/-
Silver / Kg - 96,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या घटनेला पाच महिने उलटले . त्यांनतर नानकचे अपहरण करण्यात आल्याची महिती समोर आली. अपहरणकर्त्यांनी नानकला नंदुरबारमध्ये लपवून ठेवले होते. पीडित नानक अपहरणकर्त्यांच्या तावडीतून कसाबसा सुटला आणि त्याने नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन गाठले.तसेच पोलिसांना सर्व आपबिती सांगितली.

पोलीसांनी पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांना बोलविले. त्यानंतर पीडित व्यक्तीला त्याची पत्नी नागपूरला घेऊन आली. तसेच घटनेसंदर्भात तिने लकडगंज पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या घटनेमागे ज्या पाच व्यक्तींचा हात आहे, अशा संशयित व्यक्तींची नावेही पीडित व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे.याप्रकरणी आता लकडगंज पोलीस काय करवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Advertisement