Published On : Wed, Jul 12th, 2023

नागपुरतील काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांचा विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदी दावा !

एच.के.पाटलांना पत्राद्वारे केली विनंती
Advertisement

नागपूर : राज्यात शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे संख्याबळ कमी असून त्यातुलनेत काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त आहे. हे पाहता आता काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी दावा केला आहे. हे पद आपल्याला भेटावे म्हणून काँग्रेसकडून नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे युवा आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी अ.भा. काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी एच.के. पाटील यांना पत्र पाठविले.

महाविकास आघाडी सरकारमध्ये विदर्भातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तेली समाजाला मंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे आता तरी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपदी आपल्याला संधी द्यावी,असे वंजारी यांनी पत्रात म्हटले आहे.

Advertisement

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीमुळे विधानपरिषदेत काँग्रेस हा विरोधी पक्षातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मी एक चांगला वक्ता असून विधानपरिषदेचा अडीच वर्षांच्या अल्प कालावधीत मी १२५ पेक्षा जास्त वेळा सभागृहातील चर्चेत भाग घेतला आहे. प्रश्न मांडले आहेत. काँग्रेसचा कट्टर समर्थक म्हणून मला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी द्यावी, अशी विनंती वंजारी यांनी पत्राद्वारे केली आहे.