नागपूर :लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. तर महायुतीला १९ जागांवरच समाधान मानावे लागले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य कर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले आहे.आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे, मला सरकारमधून मोकळं करावे अशी विनंती मी नेतृत्त्वाकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले.मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातले.पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीसस्वीकारत आहे.आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचे आहे.मला सरकारमधून मोकळ करावे, अशी मी विंनती करणार आहे.
बाहेर राहिलो तरी मी काम करीन.पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे,असे देवेंद्र फडणवीस भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही.सम-समान मते मिळाली आहेत. आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे.जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.
देशात एनडीएला इंडिया आघाडी पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. या यशाबद्दल देशभरातील भाजपच्या आणि एनडीएच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो. पंडीत नेहरु यांच्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा आर्शिवाद जनतेने दिला, असल्याचे फडणवीस म्हणाले.