नागपूर: शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एका भीषण अपघातच व्हिडीओ समोर आला आहे.आज दुपारच्या सुमारास नंदनवन परिसरातील केडीके कॉलेजसमोर कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात घडला.
या अपघातात एका महिलेसह अनेक जण जखमी झाले.बसन्ती गोंड,गोलू शाहू,मिश्रा,कार्तिक अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माहितीनुसार,केडीके कॉलेजसमोर रस्त्याच्या बाजूला काही गाड्या पार्क केलेल्या दिसत आहे.
तसेच टमाटर विक्रेत्याचा हातगाडाही याच ठिकाणी उभा असून एका महिला टमाटर घेत असल्याचे दिसते. तसेच काही लोकही आजूबाजूला उभे होते.याचदरम्यान समोरच्या दिशेने आलेल्या भरधाव कारने याठिकाणी उभे असलेल्यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात महिला रक्ताच्या थारोळ्यात दिसत असून एकाचा पाय फॅक्चर झाल्याचे दिसत आहे.अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरोपी चालकाला चांगलेच चोपले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी तक्रार दाखल केली असून आरोपी कार चालकाला अटक केली आहे.