Advertisement
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन भरधाव दुचाकींच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या ७८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिरामुनी कुंवरबहादूरसिंह ठाकूर (७८, रोझ कॉलनी, मानकापूर) असे मृतक महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार, ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्या उपाध्याय गेस्टहाऊससमोरून रिंग रोड ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी महिलेला धडक दिली. यात हिरामुनी गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
नातू चेतन आलोकसिंह ठाकूर याच्या तक्रारीवरून मानकापूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.